Nawazuddin Siddiqui ने पत्नी आणि सख्ख्या भावावर ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा!
Nawazuddin Siddiqui Defamation case against Wife Aaliya and His Brother : नवाजुद्दीनन सिद्दीकीनं सख्खा भाऊ आणि पत्नीवर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला असून त्यांच्याकडून लेखी स्वरुपात माफी मागण्यासही सांगितले आहे. त्याशिवाय भावानं त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचं त्यानं म्हटलं आहे.
Nawazuddin Siddiqui File Defamation case against Wife Aaliya and His Brother Shamsuddin : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरातील वादामुळे चर्चेत आहेत. आलियानं नवाजुद्दी आणि त्याच्या आईवर अनेक आरोप केले. इतकंच काय तर काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनवर आलियानं लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. दरम्यान, आता नवाजुद्दीननं आलिया आणि भावावार मानहानीचा दावा ठोकला आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी यांच्याविरोधात मुंबई हाय कोर्टात 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणात मुंबई हाय कोर्टात 30 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
नवाजुद्दीननं दाखल केलेल्या तक्रारीत त्यानं म्हटलं आहे की त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप मागे घेण्यात यावे आणि त्यासंबंधीत लेखी स्वरुपास माफी देखील मागावी असं म्हटलं आहे. त्याच प्रकरणात नवाजुद्दीननं त्याची पत्नी आलिया आणि भाऊ शमसुद्दीन विरोधात 100 कोटींचा दावा ठोकला आहे.
याचिकेत काय म्हणाला आहे नवाजुद्दीन
याचिकेत नवाजुद्दीन म्हणाला की 2008 त्याचा भाऊ शमसुद्दीननं त्याला सांगितलं की त्याच्याकडे काही काम नाही, तेव्हा नवाजुद्दीननं त्याला स्वत: चा मॅनेजर म्हणून कामाला ठेवलं. नवाजुद्दीनने आयटी रिटर्न, ऑडिटिंग, जीएसटी फाइलिंग यांसारखी सर्व कामे शमसुद्दीनवर सोपवली आणि त्यानं त्याचं लक्ष चित्रपटांवर केंद्रित केलं होतं. नवाजुद्दीननं पुढे सांगितलं की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, साईन केलेलं चेकबूक, बॅंकेचे पासवर्ड, ईमेल आयडी सगळं त्याच्या भावाला दिल्याचे सांगितले.
हेही वाचा : 'जमलंय बरं का... यायला लागतंय; Akash Thosar अडकणार लग्नबंधनात?
याचिकेत पुढे नवाजुद्दीनं भाऊ आणि पत्नी आलियाच्या सोशल मीडिया कंटेन्टवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या दोघांनी लेखी स्वरुपात माफी मागायला हवी. नवाजुद्दीननं त्याच्या भावावर आरोप केला की त्याच्या भावानं खोटं बोलून पैशांची हेराफेरी सुरु केली. चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यानं नवाजुद्दीनकडे बॅंकेत जाऊन सगळी चौकशी करण्यासाठी वेळ नव्हता. पण त्याच्या भावानं त्याला सांगितलं की मी तुझ्या नावावर प्रॉपर्टी घेतोय पण ही प्रॉपर्टी संयुक्तपणे खरेदी करण्यात आली होती. त्यात यारी रोड एक फ्लॅट, एक सेमी कमर्शियल प्रॉपर्टी, बुढानाच्या शाहपुरमध्ये एक फार्महाऊस आणि दुबईची एक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर नवाजुद्दीच्या भाईनं त्याची एक्स वाइफ आलियाला त्याच्या विरोधात अनेक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली.