मुंबई : नवाझुद्दीन सिद्धीकीच्या आगामी ‘मॉन्सून शूटआऊट’ सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३७ सेकंदाचा या टीझरमध्ये नवाझचा सायलेंट मोड ऑन आहे. चालतीये ती केवळ बंदूक. प्रत्येक शॉटमध्ये नवाझ खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. पुन्हा एकदा तो किलिंग करतान दिसणार आहे. 



१५ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात नवाझसोबतच विजय कुमार आणि तनिष्ठा चॅटर्जी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर दिग्दर्शन अमित कुमारने केलं आहे. टीझरवरून हा सिनेमा गुन्हे विश्वातली एक नवीन कथा घेऊन येणार असं दिसतंय. याआधीही नवाझने अशा किलरच्या भूमिका साकारल्या आहेत, पण यात काय नवीन असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.