मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा 'ठाकरे' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. 2019 मध्ये नवाजुद्दीन ठाकरे या बायोपिकने सुरूवात करणार आहे. या सिनेमाबाबत खूप चर्चा होत असताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीचा बाळासाहेब ठाकरेंच्या वेशातील एक लूक समोर आला आहे. या लूकमध्ये नवाज अगदी बाळासाहेबांच्या तरूणपणातील वाटत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भूमिकेसाठी नवाजुद्दीन बरीच मेहनत घेत आहे. ‘बाळासाहेबांच्या भूमिकेच्या शिवधनुष्याचा भार पेलवणार की नाही या विचारांत आजही अनेक रात्र न झोपता जातात,’ असं नवाजुद्दीन म्हणाला. दिग्दर्शक अभिजीत पानसरे यांनी या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच नवाजुद्दीनचा विचार केला होता. तर पहिल्या भेटीतच तो ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकेल असा विश्वास मनात निर्माण झाल्याचं राऊत यांनी सांगितलं. ‘बाळासाहेबांनी सामान्य माणसातला सुपरमॅन जागा केला. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचं जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटलं जावं तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचंच,’ असं राऊत यावेळी म्हणाले. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र या अगोदर नवाजुद्दीनचा लूक मात्र चर्चेत आला आहे. 



या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नवाजुद्दीन आपल्या कामामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सिरिजीमुळे चर्चेत आला आहे. नवाजने गणेश गायतोंडेची जी भूमिका साकारली आहे. त्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंद केलं आहे. गणेश गायतोंडेवरून आता अनेक मेमेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.