मुंबई : सेलिब्रिटी थाटामाटात लग्न केल्यानंतर परदेशात हनिमूनसाठी जातात. आता दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara)  आणि चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून रोजी लग्नगाठ बांधली, त्यानंतर दोघेही अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आले. 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले, त्यानंतर हे जोडपे हनिमून साजरा करण्यासाठी स्पेनला रवाना झाले. सध्या त्यांच्या हनिमूनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नयनतारा आणि विघ्नेश शिवन सध्या स्पेनमध्ये आनंद लुटताना दिसत आहे. त्यांच्या आनंदाच्या क्षणांची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येते. हनिमून दरम्यान दोघेही स्पेनच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.


महत्त्वाच म्हणजे स्पेनमध्ये हनिमून म्हटल तर प्रचंड खर्च असतो. पण नयनतारा आणि विघ्नेश स्पेनमध्ये फ्रीमध्ये फिरत आहेत. नयनतारा आणि विघ्नेश ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं जवळपास 2.5 लाख आहे. 


जर एकदिवस हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च दोन लाखांच्या आसपास असेल तर, इतर खर्च किती असेल? हे एक कोडच आहे. दोघे स्पेनमध्ये फ्री फिरत आहेत, तर त्यांच्या हनिमूनचा खर्च नक्की कोण करत असेल असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला आहे.  


रिपोर्टनुसार, नयनतारा आणि विघ्नेश यांच्या स्पेनच्या ट्रिपला ओटीटी प्लेटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) ने स्पॉन्सर केलं आहे.  30 सप्टेंबर रोजी दोघांच्या लग्नावर बनवलेला नयनतारा 'बियॉन्ड द फेयरी टेल' ही डॉक्यूमेंट्री  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे डॉक्यूमेंट्रीला प्रमोट करण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ नयनतारा आणि विघ्नेश यांची ट्रिप स्पॉन्सर केली आहे.