Nayanthara Apologizes After Annapoorani Controversy : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात दिसलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा गेल्या काही दिवसांपासून 'अन्नपूर्णी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता कारण यात श्रीराम यांना मांसाहारी म्हटलं आहे. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर श्रीराम यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्यावरून हा खूप मोठा वाद झाला आणि चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आला. इतकंच नाही तर या चित्रपटाविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्याशिवाय या चित्रपटातून हिंदूच्या भावना दुखावल्याचे देखील म्हटले जात होते. त्यानंतर नयनतारानं सगळ्यांची माफी मागितली. तिनं हे देखील सांगितलं की स्वत: मंदिरात दर्शन करण्यासाठी जाते. तिचा देवावर विश्वास आहे. जे काही झालं ते न कळत झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नयनतारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या सुरुवातीला नयनतारानं ओम आणि जय श्री राम असं लिहिलं आहे. त्यानंतर तिनं पुढे लिहिलं की ही पोस्ट मी अंतःकरणाने आणि सत्याच्या आधारी ही पोस्ट लिहिते. आमच्या 'अन्नपूर्णी' चित्रपटावरून गेल्या काही काळापासून जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, त्याबद्दल मला सर्व देशवासियांना सांगायचे आहे. कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही त्यातून मिळणारा प्रॉफिट नाही तर त्याच्यातून देण्यात येणारा संदेश आहे. हिच गोष्ट 'अन्नपूर्णी' साठी आहे असं म्हणता येईल आणि मेहनत एक चांगल्या विचारानं करण्यात आलं. ज्याचा उद्देश हा जीवनाचा जो प्रवास आहे तो प्रवास दाखवण्याची इच्छाशक्ती आणि त्यातून येणारे सगळे अडथळे दूर करणं आहे.'



पुढे नयनतारा म्हणाली, 'प्रामाणिकपणे एक चांगला आणि पॉजिटिव्ह मेसेज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. या प्रयत्नात आम्ही चुकून लोकांच्या भावना दुखावल्या. आम्हाला काही अंदाज नव्हता की चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या आमच्या सेंसरयुक्त चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढण्यात येईल. माझा आणि माझ्या टीमचा कोणच्याही भावना दुखावण्याचा विचार नव्हता.'


अशा विचारावर पुढे नयनतारा म्हणाली, 'असा विचार चुकूनही माझ्या डोक्यात येणार नाही, कारण मी स्वत: अशी व्यक्ती आहे, जिचा देवावर विश्वास आहे आणि देशातील वेगवेगळ्या मंदिरांनमध्ये जाऊन दर्शन घेते. या मुद्यावर गंभीरतेनं विचार केल्यानंतर मी त्या सगळ्या लोकांची मनापासून क्षमा मागते, ज्यांच्या भावना आम्ही दुखावल्या आहे.'