मुंबई : साऊथची सुपरस्टार नयनताराने नुकतंच विघ्नेश शिवसोबत लग्न केलं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी दोघांनीही अभिनेत्रीचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर नयनताराची एक न पाहिलेली झलकही समोर आली आहे. या फोटोमध्ये नयनतारा रजनीकांतसोबत डान्स करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहतेही या सुंदर फोटोवर कमेंट करताना थकत नाहीयेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नयनताराचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नयनतारा पहिल्या फोटोमध्ये रजनीकांतसोबत डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत रजनीकांत विघ्नेश शिवा आणि नयनताराला लग्नाची भेट देताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत नयनतारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मिठी मारताना दिसत आहे. चौथ्या फोटोत सर्व स्टार्स एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.



नयनतारा शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात काम करत आहे.   2 जून 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने नुकत्याच शेअर केलेल्या टीझरमध्ये दोघांची धमाकेदार शैली पाहायला मिळाली. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.