मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या ड्राईव्हरची चौकशी सुरु आहे. एनसीबी सूत्रांचे म्हणणे आहे की आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह त्याचा चालक क्रूझ टर्मिनलवर आला. आता याची पुष्टी करण्यासाठी एजन्सी आर्यनच्या ड्राईव्हरची समन्स पाठवून चौकशी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी जामीन मंजूर झाला नाही


ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. यानंतर आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले.


एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आर्यनसह या प्रकरणात अटक केलेल्या इतर पाच आरोपींनाही आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. ते म्हणाले की, मुनमुन धमेचासह दोन महिला आरोपींना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.


या लोकांना कारागृहात कोणतीही विशेष सुविधा मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. क्रूझवर पार्टी दरम्यान ड्रग्स मिळवल्याबद्दल एनसीबीने आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे.


आर्यनला तुरुंगात अलग ठेवण्यात आले


आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना तुरुंगातील क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, परंतु कारागृहाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन आरोपींना 3 ते 5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.


जर या दोघांमध्ये 3-5 दिवसात कोरोनाची लक्षणे दिसली तर त्यांना या सेलमध्ये ठेवले जाईल. सध्या, आर्यन आणि अरबाज दोघेही नवीन कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील बॅरेक नंबर- 1 मध्ये आहेत.