मुंबई : एनसीबी अर्जुन रामपालला अटक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एनसीबीच्या छाप्यावेळी अर्जुनने प्रतिबंधित औषधांबाबत डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवलं होतं पण ते जुनं असल्याचं तपासात समोर आलंय. दरम्यान  अर्जुन रामपालच एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनचा दावा आहे. एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनचं म्हणणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन रामपालची एनसीबी (NCB) चौकशी करण्याची आली ही चौकशी सुमारे सहा तास चालली.  त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा अमली पदार्थांचा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली. अर्जुन रामपाल बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांचे नाव या अगोदर कधीच वादात आले नव्हते.


या प्रकरणी 22 डिसेंबर रोजी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, परंतु त्याला एनसीबीने आज म्हणजे 21 डिसेंबर रोजी समन्स बजावले. अर्जुन रामपालची 16 नोव्हेंबर रोजी प्रथम चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्ससाठी पाठविले होते.



अर्जुन रामपालच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून तपास यंत्रणेला काही नवीन पुरावे मिळाल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून समोर आली आहे. तसेच असे म्हटले होते की हे पुरावे आहेत, ज्यामुळे अर्जुन रामपालची अटक होऊ शकते.