मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. अलीकडेच, NCB ने त्याला क्रूझवरील रेव्ह पार्टीत अटक केले. तेव्हापासून आर्यन खान आणि शाहरुख खान हे चर्चेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्स प्रकरणात किंग खानच्या मुलाचे नाव आल्यानंतर बॉलिवूडचे अनेक स्टार्स आणि देशातील सेलिब्रिटीज आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


एनसीबी आर्यन खानला सुपर-डुपर हिट बनवत असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे. चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियाद्वारे हे सांगितले आहे. राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेक मुद्यांवर त्याचं मत देताना दिसतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या ड्रग्स प्रकरणावर राम गोपाल वर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.


राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'शाहरुख खानच्या सर्व खऱ्या चाहत्यांनी त्यांच्या सुपरस्टारच्या मुलाला सुपर डुपर स्टार बनवल्याबद्दल महान NCB चे आभार मानले पाहिजेत. फक्त खऱ्या चाहत्यांसाठी मला एनसीबीचा जयघोष करावासा वाटतोय."



राम गोपाल वर्मा यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, 'शाहरुख खानने आपल्या मुलाला फक्त सुपरस्टार बनवले, पण एनसीबीने त्याला जीवनाची दुसरी बाजू दाखवून त्याला एक अतिसंवेदनशील अभिनेता बनवले आहे, जेणेकरून तो जीवनात आपली कामगिरी दाखवू शकेल आणि व्यक्तिमत्त्व तेजस्वी बनविण्यासाठी जमिनीवरील वास्तव समजून घेऊ शकेल.