मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh Rajput‌) मृत्यूप्रकरणी जोडलेल्या ड्रग्स प्रकरणात, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसाद यांना समन्स बजावण्यात आला आहे. क्षितिज यांना 25 सप्टेंबर रोजी 11 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या ड्रग्स पेडलर्सने एनसीबीकडे क्षितिज प्रसाद यांच्या नावाचा खुलासा केल्याची माहिती आहे. याआधी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही एनसीबीने समन्स पाठवला आहे.


शुक्रवारी रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे. दीपिका उद्या होणाऱ्या चौकशीसाठी गोव्याहून मुंबईत दाखल होत आहे. दीपिकाला चार्टर प्लेनने येण्याची परवानगी मिळाली आहे. गोव्याहून दुपारी जवळपास 1.30 वाजता मुंबईसाठी रवाना झाली आहे. एअरपोर्टवर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.


दीपिका पदुकोणविरोधात एनसीबीला तिचं एक ड्रग्स चॅट मिळालं होतं. हे ड्रग्स चॅट 28 ऑक्टोबर 2017 मधील असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीला मिळालेल्या चॅटमध्ये दीपिका, मॅनेजर करिश्मा प्रकाशकडे हशीश या नावाच्या ड्रग्सची मागणी करत असल्याचं समजतंय.