Sach Kahun Toh : नीना गुप्ता यांच्याकडून ऑटोबायोग्राफीची घोषणा
नीना गुप्ता नेहमीच त्यांची भूमिका उत्तम प्रकारे बजावतात.
मुंबई : नुकताच बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांचा 'सरदार का ग्रँडसन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नीना गुप्ता यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. नीना गुप्ता नेहमीच त्यांची भूमिका उत्तम प्रकारे बजावतात. नीना गुप्ता अनेकदा आपल्या आयुष्याविषयी बऱ्याचदा मुलाखतीत सांगत असतात. पण आता त्यांचा जीवनावर आधारित एक पुस्तक येत आहे. ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक थर उघडकीस येणार आहे, जे त्यांनी कधीच जगासमोर आणले नाहीत.
नीना गुप्ता यांच्या या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे. 'सच कहूं तो' नीना गुप्ता यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून ऑटोबायोग्राफीचं टायटलं जाहीर केलं आहे. नीना गुप्ता यांनीही या घोषणेबद्दल आनंद व्यक्त केला आणि जेव्हा त्यांनी याची घोषणा केली तेव्हा, त्या किती उत्साहित आहेत ते चाहत्यांना सांगितलं.
नीना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफीचं मुखपृष्ठ शेअर केलं
नीना यांनी आपल्या पोस्टमध्ये ऑटोबायोग्राफीचं मुखपृष्ठ शेअर केलं आहे. कव्हर पेजवर नीना गुप्ता यांचा एक हसरा फोटो आहे, ज्यावर असं लिहिलं आहे की, 'सच कहूं तो'. या पोस्टच्या माध्यमातून नीना गुप्ता यांनी सांगितलं की, हे पुस्तक प्री-ऑर्डरवर उपलब्ध आहे.
त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या आनंदित होवून पुस्तकाची पहली सँपल कॉपी दाखवत आहेत. त्या म्हणाल्या की, हे पुस्तक पहिल्यांदा पाहून मला खूप आनंद झाला व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभारही मानले.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी माझं 'सच कहूं तो' हे आत्मचरित्र लिहिलं होतं. मला वाटलं की या अतिशय कठीण आणि दु: खी काळात, जेव्हा आपण घरातच अडकतो, तेव्हा आपण काळजीत असतो, मग कदाचित माझं पुस्तक काही कठीण दिवसांना सामोरं जाण्यास मदत करेल.
हे पुस्तक 14 जून 2021 रोजी रिलीज होईल. या पुस्तकात, त्यांच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून ते त्यांनी मिळवलेलं यश अनेक बाबी जाणून घेता येतील. तसंच नीना गुप्ता यांच्या वैयक्तिक जीवनाचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे.