मुंबई : तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर 'सांड की आंख' सिनेमाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. दोन्ही अभिनेत्री यामध्ये चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची भूमिका साकारत आहे. ज्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शूटिंगची प्रॅक्टिस केली होती. याच कथेवर हा सिनेमा आधारित आहे. पण या अभिनेत्रींवर ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता माज्ञ रागावल्या आहेत आणि त्यांनी ट्विटरवर अगदी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीना गुप्ता यांनी तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकरच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. झालं असं की, या सिनेमाचा ट्रेलर पाहून एका युझरने ट्विट केलं होतं.  तो असं म्हणाला होता की, मला भूमि आणि तापसी दोघेही भरपूर आवडतात. पण मला असं वाटतं की, या पात्रांना साकारण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्रींना कास्ट करायला हवं होतं. यामध्ये आपण नीना गुप्ता, शबाना आझमी किंवा जया बच्चन यांचा विचार करू शकतो? या ट्विटवर रिऍक्ट होताना नीना गुप्ता यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, हो.. मी पण हाच विचार करत होते की, आमच्या वयाचे रोल तरी कमीत कमी आमच्याकडून करून घ्या. नीना गुप्ता यांच्या या कठोर प्रतिक्रियेचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. 



चंद्रो आणि प्रकाशी तोमर या वयोवृद्ध नेमबाज जोडीच्या जीवनप्रसंगांवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप, रिलायन्स एंटरटेंमेंट आणि निधी परमार यांनी केली आहे. 


जगातील आणि भारतातील वयोवृद्ध नेमबाज जोडी म्हणून ख्याती प्राप्त असणाऱ्या दोन अफलातून आजीबाईंचा प्रवास आणि विविध स्पर्धांमध्ये त्यांची मिळवलेलं यश हा सारा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. 


'सांड की आँख' चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासूनच त्याच्या कथानकाविषयी कुतूहल पाहायला मिळत होतं. त्यातच भूमी आणि तापसीचा एकंदर लूक पाहता, पारंपरिक हरयावी वेशात या दोघींचा अंदाजही तितकाच मनं जिंकणारा ठरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा छोरियाँ किसीसे कम नही.... असं सिद्ध करणारा हा 'सांड की आँख' बॉक्स ऑफिसवर तगड्या कमाईचा नेम साधतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.