मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर 'बधाई हो' फेम अभिनेत्री नीना गुप्ता देखील चित्रपटात भूमिका साकारणार होत्या. परंतु त्यांना आता चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सूर्यवंशी' चित्रपटामध्ये त्या अक्षयच्या आईच्या भूमिकेला न्याय देणार होत्या. एवढचं नाही तर त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणानाला सुरूवात देखील केली होती. पण त्यांची भूमिका चित्रपटामध्ये चांगली वाटतं नसल्याचे रोहित शेट्टीच्या लक्षात येताच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 



'हा हे खरं आहे. मी आता 'सूर्यवंशी' चित्रपटाचा भाग नाही. तीन दिवस मी चित्रपटाचं चित्रीकरण केलं आहे. पण आता माझ्या भूमिकेची गरजं नसल्याचं चित्रपटाच्या टीमला लक्षात आलं. म्हणून त्यांनी माझा भाग कट केला आहे.' अशी प्रतिक्रिया खुद्द नीना गुप्ता यांनी दिली आहे. 


अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. रोहित शेट्टीने 'सिंघम'मधून अजय देवगन तर 'सिम्बा'तून रणवीर सिंगला पोलीस बनवलं आहे. आता तो पहिल्यांदाच 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या माध्यमातून अक्षयसोबत काम करताना दिसणार आहे. चित्रपटात अक्षय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.