मुंबई : नीना गुप्ता यांना त्यांच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखलं जातं. याशिवाय त्या बेधडकपणे कोणत्याही विषयावर बोलायला मागेपुढे पाहत नाही. नुकताच नीना यांचा 'सरदार का ग्रँन्डसन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नीना शिवाय अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडेच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही क्षण एकटीने घालवले त्या दिवसांबद्दल नीना यांनी काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्यांनी आयुष्यातला बराच वेळ एकट्याने घालवला, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीना पुढे म्हणाल्या, 'बराच काळ मी एकटी राहत होती. कारण माझा कोणी पती नव्हता ना कोणी बॉयफ्रेंन्ड. माझे वडील माझे मित्र होते. ते आमच्या घरातले मर्द होते.' नीना पुढे म्हणाल्या, 'मला कायम एकटेपणा वाटत असे, मात्र देवाने मला पुढे जाण्यासाठी सामर्थ्य दिलं. मी माझ्या पास्टमध्ये कधीच अडकून बसले नाही.'


काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नीना म्हणाल्या, गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये मी आणि माझा नवरा विवेक पहिल्यांदा नवरा - बायको सारखं राहिलो. नीना म्हणाल्या, 'माझा नवरा दिल्लीत राहतो आणि मी मुंबईत राहते. म्हणून, आम्ही पहिल्यांदाच पती-पत्नीप्रमाणे लॉकडाऊनमध्ये राहिलो.


नीना यांनी हे पण सांगितलं की, एकत्र राहुनही अनेकवेळा दोघंही एकमेकांसोबत साईन भाषेत किंवा इशारे करुन बोलतो. कारण विवेक फोनवर ऑफिसच्या कामात बिझी असतो. नीना यांनी पत्नी म्हणून बरेच चांगले धडे घेतले आहेत, आणि म्हणूनच त्या स्वत:चे आयुष्य वेगळं जगतात.


जर मुलगी मसाबाला विवेक आवडले नसते तर लग्न केलं नसतं..
नीना आणि विवेक यांनी 2008 मध्ये लग्न केलं. नीना यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जर मसाबाला विवेक आवडले नसते किंवा विवेकला मसाबा आवडली नसती, तर मी विवेकशी लग्न केलं नसतं. मग मी त्यांच्यावर किती प्रेम करते हे महत्त्वाचं नाही.


ज्याला माझी मुलगी आवडत नाही अशा व्यक्तीबरोबर मी संबंधात राहणार नाही. हे खूप महत्वाचं आहे  की, माझ्याबरोबर असलेल्या व्यक्तीला माझी मुलगी आवडणं गरजेचं आहे असं मला वाटतं.