ऑटोबायोग्राफीनंतर नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत, स्वत: अभिनेत्रीकडून खुलासा
अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. हल्लीच त्या त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे चर्चेत आल्या होत्या.
मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. हल्लीच त्या त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे चर्चेत आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी एक सिंगल मदर होणं काय असतं आणि त्यांनी आपल्या मुलीला त्यातून कसं वाढवलं याबद्दल सांगतलं आहे. एवढंच काय तर या ऑटोबायोग्राफीमुळे नीना गुप्ता यांच्या खासगी जीवनातील अतिशय नाजुक गोष्टी देखील सर्वांसोमर आल्या. या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे 'सच कहूं तो'. आता नीना गुप्ता या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, त्या त्यांच्या बायोपिकमुळे.
नीना गुप्ता यांचा 'सच कहूं तो' या ऑटोबायोग्राफीला लोकांनी खूप पसंती दर्शवली. त्यांच्या या ऑटोबायोग्राफीने फक्त त्यांच्या चाहत्यांचेच नाही तर बऱ्याच डायरेक्टर आणि प्रोड्यूसर लोकांचं लक्ष त्यांच्याकडे खचलं. आता नीना गुप्ता यांच्या 'सच कहूं तो' या पुस्तकावर आधारीत एक बायोपिक देखील येणार आहे.
बायकोपिक संदर्भातील बातमी स्वत: नीना गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला देण्यात आलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्यांच्या या बायोपिकबद्दल सांगताना नीनी गुप्ता यांनी सांगितलं की, त्यांना बायोपिकबद्दल बऱ्याच लोकांनी विचारले आहे, याबद्दल त्यांच्या मिटिंग्स देखील झाल्या आहेत, परंतु या प्रोजेक्टची डेट किंवा यासंदर्भात आणखी काही ठरलेलं नाही. तसेच त्यांना याबद्दल विचार करायला थोडा वेळ हवाय.
तसेच नीना गुप्ता यांना जेव्हा विचारलं गेलं की, त्यांचा रोल प्ले करण्यासाठी त्यांना कोणती अभिनेत्री योग्य वाटते, तेव्हा हा निर्णय सर्वस्वी मेकर्सचा असेल असे त्यांनी उत्तर दिले आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे हे तर नक्की झालं आहे की, त्यांच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येणार आहे. परंतु यासंदर्भात आणखी काही माहिती समोर आलेली नाही.
आपल्या पुस्तकाबद्दल बोलताना एकदा नीना गुप्ता म्हणाल्या की, "मीडिया मला ओळखत नाही, मला कोणीही नीट ओळखत नाही. मी कोणतीही ऍक्टिंग करत नाहीय, मी माझ्या आयुष्यातील खऱ्या गोष्टींबद्दल सांगत आहे. हे देखील मी स्वत: लिहिलं आहे. ना की कोणत्याही मीडियाने, जे माझ्या मनातून बाहेर आलं आहे. त्यामुळे जिथे माझ्या आयुष्यात ड्रामा आहे, तिथे मी तो टाकला आहे आणि जिथे नाहीय त्याला तिथेच सोडून दिलंय...."
खरंतर नीना गुप्ता यांच्या अशा वक्तव्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचं पुस्तक वाचावसं वाटलं. नीना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी हिट ठरल्यानंतरच तिचा सिनेमा बनवावा असं मेकर्सना वाटलं.
पुस्तक प्रकाशनानंतर नीना गुप्ता खुपच चर्चेत आल्या, आता त्यांचा चित्रपट देखील तितकाच हिट ठरेल का? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.