Neena gupta on Husband -Wife Relation :  बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena gupta) त्यांच्या सिनेमांसोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळं चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील त्या अनेकदा चर्चेत असतात. नीना याचं 'सच कहूं तो' हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वी चर्चेत आलं होतं.या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला होता. अनेकदा त्यांनी आयुष्यातील अनुभवावरून तरुणांना सल्ले दिले आहेत. अशातच आता एका मुलाखतीत त्यांनी  स्त्री-पुरुष समानतेबद्दल मोठं वक्तव्य (Neena Gupta Sensational statement) केलं आहे. नेमकं काय म्हणाल्या नीना गुप्ता पाहुया..


काय म्हणाल्या Neena Gupta ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या अनेक महिला अशा आहेत, ज्या नको असलेल्या नात्यात अडकल्या जातात. पण त्यांच्याकडे नात्यातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नसतो. प्रत्येक रोमाँटिक रिलेशनशिपची सुरुवात वासनेने सुरु होते. नोकरी, बुद्धीमत्ता, हुशारी इत्यादी गोष्टींमुळे तुम्ही आकर्षित होता. पण बायोलॉजीलक रिलेशनशिपमध्ये फक्त वासना असते. माझ्या पिढीतील लोकांमध्ये शारीरिक संबंधांचं फार महत्त्व नव्हतं, असं म्हणत नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलंय.


शारीरिक संबंध फक्त एक कर्तव्य होतं. माझ्या पिढीतील लोकांमध्ये शारीरिक संबंधांचं फार महत्त्व नव्हतं. त्यामुळे महिला आपल्या पतीला संतुष्ट करत शकत होत्या. स्वत:च्या आनंदाला प्राधान्य द्यायला आम्हाला शिकवलं नाही, असं नीना गुप्ता यांनी म्हटलं आहे. आमच्या नात्यात रोमान्स नसायचा. महिलांनी फक्त पतीला आनंदी ठेवायला पाहिजे, एवढीच इच्छा असायची, असं नीना गुप्ता म्हणाल्या आहेत.


प्रत्येक महिलेला रोमान्सची गरज असते. मात्र आमच्याकडे ते मागण्याची परवानगी नसायची. महिला आमच्यावेळी खूप सेन्सेटिव्ह नसायच्या. महिलांनी स्वत:कडे लक्ष देणं सोडलं होतं. हाच उपक्रम गेली अनेकवर्ष चालू होता. महिलांना कायम स्वतःचं मन मारुन जगावं लागत होतं. आता परिस्थिती बदली आहे. मुली आता स्वत:च्या पायावर उभं राहू लागल्या आहेत.


दरम्यान, नीना गुप्ता यांनी दिल्लीतल्या सीए विवेक मेहरा यांच्याशी २००८ मध्ये लग्न केलं आहे. 1982 मध्ये आलेल्या साथ-साथ या सिनेमात नीना गुप्ता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकल्या होत्या. मसाबा असं नीना गुप्ता यांच्या मुलीचं नाव असून ती बॉलिवूडमधली लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे.