लग्नासाठी तयार होत्या निना गुप्ता; पण शेवटच्या क्षणी सर्वकाही संपलं
इंडस्ट्रीमधील राजनीती, कास्टिंग काऊच इत्यादी गोष्टींबद्दल निना यांनी सांगितंल आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेत्री निना गुप्ता यांना त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल जीवनात अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. सर्व संकटांवर त्यांनी मात केली आणि आज अनेक मुलींच्या आयुष्यात त्या प्रेरणास्थानी आहे. निना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी प्रदर्शित करण्यात आली आहे. अभिनेत्री करीना कपूरच्या हस्ते त्यांची ऑटोबायोग्राफी लाँच करण्यात आली. यावेळी निना यांनी त्यांच्या जीवनातील अनेक चांगले-वाईट अनुभव सांगितले आहेत.
निना म्हणाल्या, 'आजही मला माहिती नाही नक्की काय झालं. पण तेव्हा मी काय करू शकतं होते? मी जीवनात पुढे निघून गेली. मी त्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत होती. त्याच्या आई-वडिलांचा आदर करत होती. त्या व्यक्तीसोबत मी त्याच्या घरात राहत होती. पण त्या व्यक्तीने लग्न तोडायला दोन मिनिटं देखील नाही लावली.'
'लोक मला म्हणायचं मी माझ्या मनाने माझं जीवन जगते. पण असं काही नव्हतं. जेव्हा मला वाटलं मी चूक आहे. माझी चूक मी स्वीकारली आणि जीवनात पुढे गेली. पती, एक बाळ आणि सासू-सासरे अशी माझी देखील इच्छा होती. दुसऱ्या महिलांना मी जेव्हा पाहायची मला वाईट वाटायचं.' निना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा केला.
इंडस्ट्रीमधील राजनीती, कास्टिंग काऊच इत्यादी गोष्टींबद्दल निना बोल्ल्या आहेत. निना यांचं माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड यांच्यासोबत अफेयर होतं. रिचर्ड विवाहीत होते. कालांतराने दोघे विभक्त झाले. अनेक अडचणींचा सामना करत असताना निना यांनी रिचर्डच्या मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा आसे असून त्यांनी सीए विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं आहे.