Neena Gupta on Sex Education: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या लवकरच आपल्याला Lust Stories 2 मध्ये दिसणार आहेत. सध्या या चित्रपटातील बोल्ड सीन्स चर्चेत आहेत. अनेक यावर आपेक्ष घेत आहेत. तर काहींनी नीना गुप्ता यांच्या डायलॉग्सवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, 'लस्ट स्टोरीच 2' ची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असताना नीना गुप्ता यांनी या चित्रपटाला होकार का दिला आणि कशा प्रकारे चित्रपटात सेक्सच्या अवतीभोवती डायलॉग्स आले याविषयी त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. याविषयी सांगताना नीना गुप्ता यांनी सांगितले की त्या मोठ्या होत असताना त्यांच्या आईनं त्यांना कधीच सेक्स विषयी माहिती दिली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईनं सेक्सविषयी कधी काही सांगितलं नाही याविषयी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, "जर या गोष्टी आजीनं केल्या नसत्या तर त्याचा काही इफेक्ट झाला नसता. त्यामुळे एका आजीनं अशा गोष्टी बोलणं गरजेच आहे ज्या चित्रपटात सांगितल्या आहेत." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे नीना गुप्ता यांनी तरुणांशी सेक्सवर चर्चा करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे अनुभव देखील सांगितले. नीना म्हणाल्या त्यांनी कधीच त्यांच्या आई-वडिलांना वेगळं झोपलेलं पाहिलं नाही. याविषयी सांगताना नीना गुप्ता म्हणाल्या, "आम्हाला सेक्स विषयी काहीच माहित नव्हतं. माझ्या आईनं मला कधीच काही सांगितलं नाही की सेक्स काय आहे. तिनं मला कधीच सांगितलं नाही की मासिक पाळी काय असते. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा माझी आई खूप स्ट्रिकट होती. ती मला माझ्या कोणत्या मैत्रिणीसोबत देखील चित्रपट पाहायला जाऊ देत नव्हती. आधीच्या काळात याविषयी तेव्हा बोललं जात होतं जेव्हा मुलीचं लग्न होणार असतं." 


हेही वाचा : ना अभिनेता ना स्टारकिड... खुशी कपूर शुन्यातून वर आलेल्या AP Dhillon ला करतेय डेट?


पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, "लग्नाच्या आधी मुलींना सांगितलं जायचं की लग्नाच्या पहिल्या रात्री काय होतं. त्याचं कारण म्हणजे मुलगी घाबरायला नको किंवा मुलगा पळून जायला नको. पण तेव्हा देखील मुलींना हे समजवलं जात होतं की त्यांची जबाबदारी आहे की त्यांना मुलांना जन्म द्यायचा आहे आणि जेव्हा पती सेक्सची इच्छा व्यक्त करेल तेव्हा मुलीला कशा प्रकारे तिची ड्यूटी करायची आहे." दरम्यान, 'लस्ट स्टोरीज 1' चा पहिला भाग हा चांगलाच चर्चेत होता. आता त्याचा दुसरा पार्ट येणार आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.