Neena Gupta : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या आगामी सीरिज 'पंचायत 3' मुळे चर्चेत आहेत. या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. नीना गुप्ता यांनी वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं करिअर सगळ्यांना पाहायला मिळालं. नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय नीना गुप्ता यांनी त्यांना देण्यात आलेल्या 'बंडखोर कलाकार' आणि बोल्ड अभिनेत्री सारख्या टॅगवर वक्तव केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना देण्यात आलेले हे टॅग चुकीचे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीना गुप्ता यांनी 1982 मध्ये करिअरला सुरुवात केली. करिअरचा सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता. नीना गुप्ता यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं की प्रत्येकी तीन महिन्यांनंतर त्यांना बॅग पॅक करुन मुंबई सोडण्याची इच्छा व्हायची. नीनानं सांगितलं की 'मी तर तसं ही दिल्लीवरून आले होते. त्यातही सुरुवातीला मुंबईमध्ये राहणं खूप कठीण असतं. त्यामुळे दर तीन महिन्यानं मला वाटायचं की मुंबई सोडून जावं. मी शिकलेले होते. मी म्हणायचे की मी परत जाईन आणि पीएचडी करेन. मी मुंबईत हे सगळं सहन करु शकत नाही. पण मुंबई हे असं शहर आहे. मी विचार करायचे की चल उद्या जाईन मी तर आज रात्री वाटायचं की उद्या काही काम मिळेल, तर ते तुम्हाला थांबवून ठेवतं. असं अनेकदा झालंय.' 



पुढे त्यांच्या स्ट्रगल आणि एकंदरीत त्यांच्या करिअरमधील चढ-उतारावर देखील बोलले आहेत. नीनानं सांगितलं की अखेर त्या आता त्यांच्या करिअरच्या त्या ठिकाणी आहेत जिथे त्या भूमिकांना नकार देऊ शकतात. नीना म्हणाल्या, 'गरजेनुसार हे बदल झालेत. आधी पैशांची खूप गरज होती तर पैशांसाठी खूप घाणेरडं काम करावं लागलं. अनेकदा मी देवाकडे प्रार्थना करायचे की चित्रपट प्रदर्शितच नाही झाला पाहिजे. आता मी नाही बोलू शकते, आधी कधीच नाही बोलायचे नाही. जी स्क्रिप्ट मला खूप आवडते, भूमिका आवडते त्यांना आता हो बोलते. जी नाही आवडतं त्यांना नाही बोलते.' 


हेही वाचा : Read More