जातीवादी ट्विट करणा-या निर्मात्याला दिग्दर्शक नीरज घेवनचं उत्तर
‘मसान’ या गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक नीरज घेवन याने सिने निर्माता विवेक अग्निहोत्री याच्या जातीवादी ट्विटला उत्तर दिलंय. या उत्तरात घेवन म्हणाला की, त्याने दलित असल्याची ओळख न दाखवता ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जिंकला.
मुंबई : ‘मसान’ या गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक नीरज घेवन याने सिने निर्माता विवेक अग्निहोत्री याच्या जातीवादी ट्विटला उत्तर दिलंय. या उत्तरात घेवन म्हणाला की, त्याने दलित असल्याची ओळख न दाखवता ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जिंकला.
राज्यात दलित आणि मराठ्यांच्या समूहात झालेल्या वादाच्या स्थितीत आग्निहोत्री म्हणाला होता की, ‘मी एकदा दलित नेत्याच्या नातवाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करताना पाहिलं होतं. आणि मी स्वत: ब्राम्हण असून इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होतो. पिरॅमिद उलटे झाले आहे’.
घेवनने बुधवारी अग्निहोत्रीला उत्तर देत ट्विट केले की, ‘मी एक दलित आहे. मी देशासाठी कान्स फिल्म पुरस्कार जिंकला. मी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळवला. हे सर्वच मी माझ्या दलित ओळखे शिवाय मिळवले आहे. आणि हो, आता मी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतो आणि पुढील वेळी जर तुम्हीही विमानात असाल तर मी माझी सीट तुम्हाला ऑफर करेन’.