मुंबई : जगात आशा अनेक महिला आहेत, ज्यांची पतीने अर्ध्यात साथ सोडली. बॉलिवूडमध्ये देखील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे पती आज या जगात नाहीत, पण या अभिनेत्री पुन्हा दुःख विसरून जगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोकांना मात्र त्यांचं पुन्हा आयुष्य नव्यानं आनंदाने जगणं पटत नाही.. 'लोकांना विधवा महिलेला सतत रडताना पाहायचं असतं...' असं वक्तव्य अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी नितू कपूर यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जूनियर डान्स दीवाने (Junior Dance Deewane)  शोमध्ये परीक्षकाची धुरा सांभाळत असणाऱ्या नितू कपूर यांनी भावना व्ययक्त केल्या. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नितू यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यांमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 



ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नितू कपूर सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, 'मला आनंद वाटतो म्हणून मी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मी माझ्या चाहत्यांवर प्रचंड प्रेम करते...'


त्या पुढे म्हणाल्या, 'लोक म्हणतात पतीचं निधन झालं आहे आणि मी मज्जा करते. अशा लोकांना मी तात्काळ ब्लॉक करते. ऋषी यांच्या निधनानंतर मी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करते. पण लोकांना विधवा महिलेला सतत रडताना पाहायचं असतं...'' पण नितू यांनी आयुष्यात आनंदी राहण्याचा निर्णय घेतला आहे.