मुंबई : बॉलिवूडचं प्रसिद्ध  कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकलं. त्याचबरोबर, लग्नाच्या दोन दिवसांनंतर  या कपलने त्यांच्या घरी लग्नाची पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर या कपलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच लग्नाशी संबंधित काही नवीन बातम्याही समोर येत आहेत. या कपलला लग्नात अनेक महागड्या भेटवस्तूही मिळाल्याची बातमी अलीकडेच आली होती. करीना कपूर खानपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी या जोडप्याला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.


त्याचबरोबर अभिनेत्री नीतू कपूरने देखील या कपलला महागडी भेटवस्तू दिली आहे. रणबीरच्या आईने तिचा मुलगा आणि सून आलिया भट्टला 26 कोटींचा 6 BHK फ्लॅट गिफ्ट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीरची आई नीतू कपूर यांनी कथितपणे तिचा मुलगा आणि सुनेला 26 कोटी रुपयांचा 6BHK फ्लॅट गिफ्ट केला आहे.


आलिया सून म्हणून मिळाल्याने नीतू कपूर खूप खूश आहेत. अभिनेत्री सतत आपला आनंद व्यक्त करत असते.