Lata Mangeshkar : ईर्ष्येतून कुणी पाजलं विष; तर एक निर्णयामुळे आजन्म झाला पश्चाताप ; असं होतं लता मंगेशकर यांचं खडतर आयुष्य

दिवंगत बॉलिवूड गायिका लता मंगेशकर आज आयुष्य अतिशय खडतर राहिलं. आज जयंतीनिमित्त  त्यांच्या जीवनातील 10 अशा गोष्टी आणि प्रसंग जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फारच कमी माहिती आहे. 

| Sep 28, 2024, 08:50 AM IST

28 सप्टेंबर हा दिवस बॉलिवूडमधील स्वर कोकिला लता मंगेशकर यांचा हा जन्मदिवस. लता मंगेशकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांना कायमच गाण्यांच्या रुपाने आठवत असतो. लता मंगेशकर यांची गाणी आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. लता मंगेशकर यांचा हा प्रवास सोपा नव्हता. जीवनात खडलेल्या अनेक प्रसंगांना त्या सामोऱ्या गेल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या जीवनातील 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत. 

1/10

लता दीदींच खरं नाव

लता मंगेशकर यांचं खरं नाव हे हेमा आहे. लता मंगेशकर यांच्या वडिलांनी त्यांचं नाव बदललं. त्यांच्या नाटकातील प्रमुख पात्र लतिकाच्या नावावरुन लता मंगेशकर हे नाव बदलण्यात आलं. 

2/10

का दिलं होतं विष?

लता मंगेशकर यांची कारकीर्द  एका उंचीवर पोहोचू लागताच लोकं त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करत. त्यावेळी त्यांना कुणीतीर विष देऊ केले होते. त्याकाळा लता मंगेशकर यांचे यश पाहून लोकांचा हेवा वाटू लागला होता. 

3/10

विषामुळे लता दीदी अंथरुणात

विष प्राशन केल्यामुळे लता दीदी तब्बल 3 महिने अंथरुणात होत्या. त्या काळात मजरुह सुल्तानपुरी कायम लता मंगेशकर यांना घरी जाऊन कविता एकवत असतं. 

4/10

बालपण खडतर

लता मंगेशकर यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांच म्हणेज दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं. या काळात त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. वडिलांच्या निधनानंतर बालपणीच लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली.  (हे पण वाचा >> Lata Mangeshkar Family Tree : लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूर यांच्यात काय नातं? मंगेशकरांची तिसरी पिढी सध्या काय करतेय!) 

5/10

लता दीदींचं बदललं आयुष्य

कोणी एकेकाळी बॉलिवूडमध्ये नूरजहां आणि शमशाद बेगम यांचा दबदबा होता. पाकिस्तान झाल्यानंतर नुरजहा भारत सोडून पाकिस्तानानत गेल्या. यानंतर लता मंगेशकर यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. 

6/10

पांढऱ्या साडी का नेसतं?

लता मंगेशकर कायमच पांढऱ्या रंगाच्या कॉटर्न साड्या नेसत असतं. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्यावर पांढरा रंग अतिशय सुंदर दिसतो. या एकमेव कारणामुळे त्या कायमच पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसतं. 

7/10

गाणं ऐकून 'या' व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू

 चीनच्या हल्ल्यानंतर 26 जानेवारी 1963 रोजी लता दीदींनी जगासमोर 'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याला आपला आवाज दिला. लता दीदींचं हे गाणं ऐकून तेव्हाचे पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं. 

8/10

पुरस्काराला का केला नकार

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण लता मंगेशकर यांनी फिल्मफेअर पुरस्कार घेण्यास नकार दिला होता. तेव्हा लता दीदींनी सांगितलं होतं की, ट्रॉफीवर असलेल्या महिलेच्या शरीरावर कपडे नाहीत. ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. 

9/10

लता दीदींचे गुरु कोण?

लता मंगेशकर या गुलाम हैदर साहेब यांना आपला गुरु मानत होती. जेव्हा लता मंगेशकर यांच्या विरोधात जेव्हा सगळे उभे होते. तेव्हा गुलाम हैदर साहेब त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. 

10/10

लता दीदींना कोणती सल?

लता मंगेशकरांना क्लासिकल गायक व्हायचे होते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे लता मंगेशकर यांनी बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवलं. लता मंगेशकर यांना आजही ही गोष्ट सलतेय.