मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये उपचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचलेले आहेत. यावेळी त्यांची खंबीरपणे साथ देत त्यांची पत्नी अर्थात अभिनेत्री नीतू कपूर यादेखील न्यूयॉर्कमध्ये भेटण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मोठ्या आपुलकीने आणि संयमाने भेटत आहेत. कौटुंबिक तसंच सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आणि या कुटुंबाचे मित्र-मंडळी न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यासोबतचे अनेक फोटो अनेकदा नीतू कपूर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झळकताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, नीतू कपूर यांनी नुकताच मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. या फोटोवर ऋषी कपूर आणि रणबीर कपूर एकत्रच दिसत असताना व्हिडिओत 'जसा बाप तसा बेटा' असा उल्लेख आहे. हा व्हिडिओ शेअर करत नीतू कपूर यांनी हा व्हिडिओ आपल्याला भावल्याचं सांगितलं आहे. 



या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर आणि श्रीदेवी तसंच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे नाचताना दिसत आहेत. व्हिडिओत गाणं सुरू आहे ऋषी-श्रीदेवी यांच्या 'चांदणी' सिनेमातलं... 'तेरे मेरे होठो पे'... तर रणबीरचा हा व्हिडिओ आहे 'ए दिल है मुश्कील' या सिनेमातील... 


नीतू कपूर या सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह दिसतात. त्यांचा हा कौटुंबिक अंदाजही फॅन्सच्या पसंतीस उतरलाय.