मुंबई : अभिनेते शशी कपूर यांनी वयाच्या 79 व्या वर्षी कोकिलाबेन रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीर्घ आजारपणानंतर निधन झाल्याने कपूर कुटुंबीयांप्रमाणेच अवघे बॉलिवूडही हळहळले आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. 


बॉलिवूडकरांची श्रद्धांजली 


शशी कपूरांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईबाहेर असलेले  ऋषी कपूर आणि सैफ अली खान तातडीने मुंबईत हजर झाला. अमिताभ बच्चन यांनी देखील एक ब्लॉग लिहून शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


नीतू कपूर यांची श्रद्धांजली 


कपूर कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या कुटुंबीयाचा अविभाज्य भाग असणार्‍या  शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. शशी कपूर यांचा एक खास फोटो नीतू कपूर यांनी  शेअर केला. 



 


शशी कपूर यांचा  हा फोटो त्यांच्या वडिलांसोबतचा आहे.