मुंबई : शेवटी तो क्षण आलाच जेव्हा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांनीही एकमेकांचा आयुष्यभराचे जोडीदार म्हणून स्वीकार केला. 14 एप्रिल 2022 रोजी आलियानं रणबीरचा पती म्हणून स्वीकार केला. लग्नामध्ये कपूर आणि भट्ट कुटुंबाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. रणबीरच्या आई आणि अभिनेत्री नितू कपूर देखील सुंदर दिसत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या थाटात त्यांनी सूनेचं घरात स्वगत केलं. आलियाची कपूर कुटुंबात एन्ट्री तर झाली, पण घरात आता कोणाचं जास्त चालतं? असा प्रश्न  अनेकांना पडला आहे.या गोष्टीचा खुलासा देखील खु्द्द नितू कपूर यांनी केला आहे. 



सोशल मीडियावर सध्या 'डान्स दीवाने जूनियर्स' शोचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये होस्ट करण नितू यांना विचारतो, 'घरी आता सून येणार आहे?' यावर नितू म्हणतात, 'येणार नाही आली आहे...'


पुढे करण विचारतो, 'घरी आता कोणाचं चालतं सूने चं की सासूचं...' यावर नितू म्हणतात, 'फक्त सूनचं राज्य... मला असं वाटतं फक्त सूनेचं राज्य असावं...'


दरम्यान, 'डान्स दीवाने जूनियर्स' हा शो 23 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या 'डान्स दीवाने जूनियर्स' शोचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणार आहे.