मुंबई : खूप वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर नेहा धुपिया बॉयफ्रेंड अंगद बेदीसोबत विवाहबद्ध झाली. नेहा आणि अंगदचा विवाह सर्व चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. या विवाहसोहळ्याबद्दल पूर्णपणे गुत्पता बाळण्यात आली होती. विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर नेहाने सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत ही आनंदवार्ता आपल्या चाहत्यांना दिली. त्यानंतर नेहाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यात ती पती अंगद बेदी सोबत धमाकेदार डान्स करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा आणि अंगदचा हा व्हिडिओ जूना असून यात दोघेही मस्त डान्स करत आहेत. हा व्हिडिओ एका पार्टीतील आहे. ज्यात नेहा धुपिया अंगद बेदीसोबत क्वीन सिनेमातील लंडन ठुमकदा या गाण्यावर डान्स करत आहे. तुम्हीही पहा हा व्हिडिओ...



विवाहसोहळा पार पडल्यानंतर अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता नेहा आणि अंगद दोघेही अमेरिकेला रवाना झाले आहेत. दिल्ली एअरपोर्टवर दोघांनाही स्पॉट करण्यात आले.