मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असताना बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री नेहा धुपियाने गुपचूप लग्न करुन चाहत्यांना जोरदार धक्का दिला आहे. काल आपल्या लग्नाचा फोटो सोशल साईट्सवर शेअर करत तिने विवाहाची आनंदवार्ता सर्वांना दिली. नेहा धुपियाने तिचा बेस्ट फ्रेंड अंगद बेदीसोबत लग्न केले. हे सिक्रेट वेडींग शिख रितरिवाजांनुसार झाले. तर मुंबईतील सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्नही शिख परंपरेनुसारच पार पडले. शिख परंपरेनुसार लग्न दिवसा केले जाते.


हा विवाह असतो वेगळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिख विवाह हा हिंदू धर्मातील विवाहांपेक्षा काहीसा वेगळा असतो. याच्या सर्व विधी दिवसा होतात. या विवाहात लग्न, मुहूर्त, जन्मपत्रिका जुळणे गरजेचे नसते. तर हिंदू पद्धतीत या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. शिख धर्मात गुरुवर पूर्ण आस्था असते. याला आनंद कारज म्हणतात.


म्हणून घेतले ७ ऐवजी ४ फेरे


आनंद कारजमध्ये ७ फेऱ्यांऐवजी ४ फेरे घेतले जातात. त्यामुळे नेहाचे दिल्लीत झालेल्या सीक्रेट वेडींगमध्ये ७ ऐवजी ४ फेरे घेतले. नेहा आणि अंगद खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाबाबत पूर्णपणे गुप्तता बाळगली असून यात दोन्ही परिवारांतील नातेवाईक सहभागी झाले होते.