मुंबई : बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच अजून एका अभिनेत्रीने गुपचून लग्न केल्याचे समोर आले. ती अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. अचानक लग्न करुन तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला. विवाहसोहळा पार पडल्यानंतर नेहाने सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली. आता या लग्नातील काही गोड क्षणांचे फोटोज समोर आले आहेत. पहा या सिक्रेट लग्नातील न पाहिलेले काही फोटोज...
अंगद बेदी आणि नेहा धुपियाच्या लग्नात अजय जडेजा आपल्या परिवारासह सहभागी झाला. लग्नात नेहाने पेस्टर रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. त्यात नेहा अत्यंत सुंदर दिसत होती. अंगद बेदीही सफेद शेरवानीत अतिशय हॅंडसम दिसत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विवाहसोहळ्यास अजून एका क्रिकेटरने हजेरी लावली तो म्हणजे आशिष नेहरा. अचानक झालेल्या लग्नाने नेहासोबत तिचे फॅन्सही खूप खूश आहेत.



अंगद बेदी आणि नेहा धुपियाच्या सिक्रेट मॅरेजमध्ये दोन्ही परिवारातील जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते. दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. नेहाच्या लग्नाचे फोटोज आता चांगलेच व्हायरल होत आहेत.



 


नेहा धुपियाच्या लग्नाचे फोटोज. यात नेहा अत्यंत खूश दिसत आहे. खूप काळापासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या नेहा-अंगदने अखेर लग्नगाठ बांधली.



वडील बिशन सिंग बेदीसोबत अंगद बेदी आणि नेहा. 



अंगद आणि नेहाचा सुंदर फोटो. यात दोघेही परफेक्ट कपल वाटत आहेत.



लग्नानंतर नेहा आणि अंगद युएसए ला रवाना झाले एअरपोर्टवर त्यांना स्पॉट करण्यात आले.