मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. मे महिन्यात अभिनेता अंगद बेदीसोबत अचानक विवाह करुन तिने चाहत्यांना सरप्राईज दिले. तिच्या या सिक्रेट वेडींगची सुगावा तिने कोणालाच लावून दिला नाही. त्यानंतर मात्र नेहा आणि अंगद कायम चर्चेत राहिले. सध्या ते मालदिवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा-अंगदच्या हनीमूनचे फोटोज समोर आले आहेत. यात दोघेही पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.



अलिकडेच अंगद बेदीचा सूरमा सिनेमा प्रदर्शित झाला. अंगद बेदी अभिनेता म्हणून जितका इमानदार आणि विश्वासू आहे तितकाच पती म्हणूनही आहे, असे ट्वीट नेहाने केले होते. 



मालदिवच्या निसर्गसौंदर्यात एन्जॉय करताना नेहा-अंगद.



लग्नानंतर लगेचच हे सेलिब्रेटी कपल आपआपल्या कामात बिजी झाले होते. आता एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.