https://goo.gl/R66bfE

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या चर्चा अजून संपल्याही नाहीत तोवर आणखीन एका बॉलिवूड अभिनेत्रीनं तिच्या चाहत्यांना जोरदार धक्का दिलाय. अभिनेत्री नेहा धुपिया हिनं अचानक आज आपल्या लग्नाचा फोटो शेअर केलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मात्र मोठा पण सुखद धक्का बसलाय. 2002 साली 'मिस इंडिया' ठरलेल्या नेहानं तिचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत विवाह केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा आणि अंगदचा विवाह गुरुद्वारामध्ये संपन्न झालाय. त्यानंतर नेहा आणि अंगदनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या विवाहाचा फोटो शेअर केलाय.


आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय... मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह केलाय... अशी कॅप्शनही नेहानं या फोटोला दिलीय. 



अंगद बेदीनंही नेहासोबत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हटलं... 'बेस्ट फ्रेंड आता पत्नी बनलीय... हॅलो मिसेस बेदी'



नेहाचं या सरप्राईजनं चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय.