`Sex किंवा Shahrukh Khan...`, नेहा धुपियाचं धक्कादायक वक्तव्य
Neha Dhupia नं शाहरुख खान विषयी केलेल्या एका जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Neha Dhupia Talk About Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून शाहरुख चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. शाहरुखचा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रचंड गर्दी आहे. जगभरात या चित्रपटानं 400 कोटींचा गल्ला केला आहे. दरम्यान, अभिनेत्री नेहा धुपियानं (Neha Dhupia) काही वर्षांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा नेहाचं हे वक्तव्य व्हायरल झालं असून त्या वक्तव्यावर नेहानं प्रतिक्रिया दिली आहे.
नेहानं 2004 साली एका मुलाखतीत 'एकतर सेक्स विकले जाते किंवा मग शाहरुख खान' असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा नेहा धुपियाने या वक्तव्यावर ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये नेहा म्हणाली, '20 वर्षांनंतरही माझे म्हणणे खरे आहे. ही अभिनेत्याची कारकीर्द नसून राजाची राजवट आहे.' (ये किसी एक्टर का करियर नहीं है बल्कि एक किंग का राज है.) असे नेहा म्हणाली.
2004 साली नेहाचा 'जुली' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नेहान एका सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. यावेळी नेहानं अनेक इंटिमेट सीन देखील दिले होते. इतकंच काय तर तिला लोक सेक्स सिम्बॉल म्हणून देखील बोलू लागले होते.
'पठाण'ने गाठला 300 कोटींचा टप्पा
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, भारतात 'पठाण'ने 34 ते 36 कोटींची कमाई केली आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने ही कमाई फार काही मोठी नाही. पण चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केलेली कमाई पाहता हा आकडा फार कमी आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाण चित्रपट आमीर खानच्या दंगल, बाहुबली २ आणि केजीएफ२ ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे. शाहरुखच्या या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा : जेव्हा Akshay Kumar च्या दोन EX समोरा-समोर येतात तेव्हा...
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली. यासह 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी सुरुवात मिळालेली नाही. दरम्यान जगभरातील कमाईचा आकडा 106 कोटी होता. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत पठाणने दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले. यासह जगभरातील कमाईचा आकडा 235 कोटींवर पोहोचला. तीन दिवसात पठाणने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शाहरुख खानच्या पठाणने आतापर्यंत 21 नवे रेकॉर्ड केले आहेत. कोविडनंतर पठाण पहिला चित्रपट आहे, ज्याने सलग दोन दिवस इतकी कमाई केली आहे