काम सोड आणि घरी बस; प्रेग्नंट अभिनेत्रीला निर्मात्याचा धक्कादायक सल्ला
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहा ही वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि त्यांच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या पाहता नेहाने तिचा अनुभव सर्वांना सांगितला आहे. तिचा अनुभव हा इतर अभिनेत्रींसारखा नव्हता असे तिने सांगितले. बॉलिवूड (Bollywood) घराण्यातील अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसी न्यूज (Pregnancy News) फक्त बातम्या राहिल्या नाहीत, तर त्यांना चित्रपटांच्या ऑफरही मिळतात. दरम्यान, नेहाने तिला आलेला धक्कादायक प्रेग्नेंसीचा अनुभव सांगितला आहे.
नेहाने बॉलिवूडमधील तिच्या अनुभवांविषयी सांगितले की, प्रेग्नेंसीमुळे तिला काही चित्रपटांमधून रिजेक्ट करण्यात आलं होतं. तिला सल्ला दिला होता की अशा परिस्थितीत 'तू चित्रपट सोड, शुटिंग करू नकोस आणि घरी बस.' तिने सांगितलं की एका चित्रपटात तिला आधी कास्ट करण्यात आलं होतं पण जेव्हा तिनं प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं तेव्हा तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला.
काही चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिला परदेशात जायचं होतं, परंतु निर्मात्यांनी फोन करून सांगितले की त्यांनी तिला काढून टाकलं आणि दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं आहे. जेव्हा शूटिंगला जाण्याची तारिख जवळ आली तेव्हा मला कळलं की संपूर्ण टीम आधीच निघून गेली आणि त्यांनी खरंच दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं.
41 वर्षीय नेहाच्या मते, तिचे अनुभव इतरांपेक्षा वेगळे आहेत. अशा गोष्टी कोणत्याही अभिनेत्रीचे धीर सोडू शकतात. ती म्हणाली की, “मला सांगितलं होतं की गरोदरपणात तुझा लूक बदलेल. सरळ सरळ एका कलाकाराला केलेलं रिजेक्शन आहे.” नेहाच्या करिअरचा ग्राफ हा खूप चांगला आहे, पण 2018 मध्ये लग्नानंतर अचानक तिच्या चित्रपटांची संख्या खूप कमी झाली. 2018 ते 2022 पर्यंत नेहा फक्त पाच चित्रपटांमध्ये दिसली. सगळ्यात लक्ष वेधनारी गोष्ट म्हणजे ‘अ थर्सडे’ या तिच्या चित्रपटात नेहा प्रेग्नंट दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, ती 8 महिन्यांची प्रेग्नेंट होती. या चित्रपटात ती एका गर्भवती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
मिस इंडिया असलेल्या नेहाने 2003 मध्ये तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. नेहाने 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केले. लग्नाच्या वेळी ती प्रेग्नंट होती. नेहा आणि अंगदला आता दोन मुले आहेत.