दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर नेहा धुपियाचे रुग्णालयातील ते भावनिक क्षण, पाहा व्हिडिओ
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर नेहा धुपियाच्या पतीने सोशल मीडियावर शेअर केले काही खास क्षण, पाहा व्हिडिओ
मुंबई : अभिनेत्री नेहा धुपियाने नुकताचं तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूड कपल अंगद बेदी आणि नेहा धुपिया या दोघं दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मुलगा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अंगद बेदीने पत्नी नेहा धुपियाचा फोटो शेअर करत म्हटलं,'परमेश्वराच्या कृपेने आज आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. नेहा आणि बेबी दोघंही ठिक आहेत.' आता देखील अंगदने रुग्णालयातील त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघे त्यांच्या आयुष्यातील भावनिक क्षण जगताना दिसत आहेत.
अंगदने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'जेव्हा कधी भेटलो एक सेकंड!! नेहा धुपिया तू वॉरियर आहेस... तू जे काही करतेस त्यावर मला गर्व आहे...' सध्या अंगदची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना मोठी मुलगी आहे. मुलीचे नाव मेहेर आहे. तिचा जन्म 2018 मध्ये झाला. नेहा धुपिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं 2018 साली दिल्लीतील एका गुरूद्वारात लग्न झालं. हे लग्न अतिशय खासगी पद्धतीने झालं.