दोन वेळा लग्नापर्यंत पोहोचली गोष्ट, पण नाही जमलं नेहा धुपियाचं लग्न
नेहा आणि अंगदचा विवाह गुरुद्वारामध्ये संपन्न झालाय पण..
मुंबई : २००२ साली 'मिस इंडिया' ठरलेल्या नेहानं तिचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत विवाह केलाय. नेहा आणि अंगदचा विवाह गुरुद्वारामध्ये संपन्न झालाय. त्यानंतर नेहा आणि अंगदनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या विवाहाचा फोटो शेअर केलाय. आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय... मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह केलाय... अशी कॅप्शनही नेहानं या फोटोला दिलीय. याआधी दोनवेळा नेहाच्या लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचण्याच्या बातम्या आल्या होत्या. 'कयामत' फेम नेहा धुपियाच पहिल प्रेम नॅशनल लेव्हल स्क्वॅश प्लेयर ऋतिक भट्टाचार्य होता. साधारण १० वर्षे हे दोघ एकत्र होते. दोघे लवकरच लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली होती. त्याकाळी नेहाला मोजक्या जाहीराती मिळू लागल्या होत्या. २००० मध्ये हे कपल वेगळ झाल. ऋत्विक रिअॅलिटी शो 'फियर फॅक्टर : खतरो के खिलाडी' चा रनर अप होता. त्याने नंतर पिया त्रिवेदीशी लग्न केलं.
युवराजसोबत जुळलं
२०१४ मध्ये नेहाच नाव क्रिकेटर युवराज सिंग सोबत जोडल गेल. अभिनेता-गायक सोफी चौधरीच्या बर्थ डे पार्टीला नेहा गेली होती. त्यावेळी दोघांना एकत्र पाहिलं गेल. याच्या डेटींगच्या चर्चा होऊ लागल्या. तसेच साखरपुड्यापर्यंत गोष्ट पोहोचल्याचेही सांगण्यात आले. काही काळानंतर युवराजने हेजलशी नातं पुढे नेल.
डेन्टिस्टशी प्रेम
युवराजनंतर नेहाच नाव जेम्स सिलवेस्टरशी जोडल गेल. रिपोर्टनुसार, यूएसला राहणारा डेन्टिस्ट जेम्स यूएस खासकरुन नेहासाठी मुंबईत शिफ्ट झाला. त्यानंतर तिने हो जेम्स मुंबईत शिफ्ट झालाय असे मीडियाला सांगितले होते. पण पर्सनल लाईफबद्दल काही बोलू इच्छित नसल्याचेही तिने सांगितले.