मुंबई : पुष्पा या चित्रपटाचा फिव्हर सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर व्हिडिओ बनवत आहे. नेहा कक्करनेही असाच एक प्रयत्न केला आहे. नेहा कक्करने सामंथा रुथ प्रभूच्या डान्स स्टेप्सची कॉपी करण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाण्याच्या हुक स्टेपपासून ते सेक्सी मूव्ह्स समंथाने अंटावा गाण्यात दाखवल्या आहेत. नेहा कक्करने समुद्रकिनाऱ्यावर हा व्हिडिओ शूट केला आहे. यासोबतच तिने हा संपूर्ण व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहून तिला ट्रोल केलं जात आहे.


निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या, कमरेला चन्नी बांधलेली नेहाची ही स्टाईल लोकांना आवडली नाही. 


अल्लू अर्जुनच्या मांडीवर बसून समंथाने केली ग्राउंड स्टेप, नेहानेही समुद्रकिनाऱ्यावर करून पाहिली पण एकटीने, आणि ही स्टेप पाहून काही यूजर्स नेहाच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अनेक प्रतिक्रिया तिला या व्हिडिओवर येत आहेत.


काही दिवसांपासून नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबाबत देखील जोरदार चर्चा होत असताना तिचा हा व्हिडिओ आणखीनंच चर्चेत आला आहे. बोललं जात होतं की नेहा आणि रोहनप्रीत आता बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.पण नेहाचा हा व्हिडिओ समोर येताच या केवळ अफवा असल्याचं ही बोललं जात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अलीकडे, नेहा कक्करने बॉक्स ऑफिसवर पुष्पा द राइज या सुपरहिट चित्रपटाच्या आयटम नंबरवर नृत्य करताना रील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये  नेहा कक्करने सामंथाची किलर स्टाईल, अल्लूची हुक स्टेप करताना खूप मेहनत घेतल्याचं दिसत आहे.