मुंबई : रीमिक्स असो किंवा ओरिजनल नेहा कक्कडचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरत आहेत. नेहाची फॅन फॉलिविंग प्रचंड वाढली आहे. मंगळवारी तिचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. गाणं लाँच होताच तिच्या या गाण्याला करोडो लोकांनी पाहिलं आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. युट्यूबवर देखील हे गाणं ट्रेंड होत आहे.
 
नेहा कक्कडचं 'ओ हमसफर' हे नवं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात ती तिचा ब्वॉयफ्रेंड आणि अॅक्टर हिमांश कोहलीसोबत दिसत आहे. रिलीज झाल्यानंतर 15 तासात या गाण्याला करोडो लोकांनी पाहिलं आहे. हिमांश आणि नेहा अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नेहा कक्कड नेहमी इंस्टाग्राम हिमांशसोबतचे फोटो शेअर करत असते. हिमांश 'यारियां' सिनेमातून प्रसिद्ध झाला होता. नेहाने या सिनेमात 'ब्लू है पाणी पाणी' हे गाणं गायलं होतं. हे गाणं देखील खूप हिट झालं होतं. किस डेला किस करतांना हिमांश सोबतचा फोटो नेहाने पोस्ट केला होता. इंस्टाग्रामवर हिमांशचे 47 हजार फॉलोवर्स आहेत तर नेहा कक्कडचे 90 लाख फॉलोअर्स आहेत.