मुंबई : देशातील टॅलेंटेड गायकांपैकी एक असलेल्या नेहा कक्करचं प्रत्येक गाणं लोकांना फार आवडतं. नेहा ही देशातील सर्वाधिक फॉलो केली जाणारी गायिका आहे. पण आज ती ज्याठिकाणी पोहोचली आहे, हा प्रत्येकाच्या बसचा विषय नाही. मोठ्या आव्हानांना तोंड देत गायिकेने स्वतःसाठी आज हे यश मिळवलं आहे. ज्याचं लोकं फक्त स्वप्न पाहत आहेत. एकेकाळी नेहा अशा आजाराची शिकार झाली होती, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा आजारी होती
नेहा कक्करने गेल्या वर्षी असा खुलासा केला होता ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिने सांगितलं होतं की, ती एंग्जायटीची झाली शिकार होती आणि त्याच वेळी तिला थायरॉईड होता. सिंगरने सांगितलं की, इतर लोकांप्रमाणेच तिलाही चिंता आणि तणावाच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. नेहा कक्करने स्वत:ला कसंबसं संभाळलं आणि स्वत:ला सक्षम बनवलं. आता नेहा पुर्मपणे ठिक आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रिलीज केलं आपलं नवं गाणं
नेहा कक्कर नुकतंच तिचं नवीन गाणं 'ला ला ला' घेऊन आली आहे. या व्हिडिओ गाण्यात तिच्यासोबत पती रोहनप्रीतही दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री याआधीही पाहायला मिळाली होती. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं. नेहाच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पती रोहनप्रीतसोबत रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत असून लोकांना हे 'ला ला ला' गाणे खूप आवडते.