मुंबई : सिंगिंग सेंसेशन नेहा कक्करला आज बॉलिवूडची हिट मशीन म्हटलं जातं. प्रत्येक गाणं तिच्या मखमली आवाजाने हिट होतच.  आज तिची लोकप्रियता कोटींच्या घरात आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याआधी तिने खूप संघर्षमय दिवस पाहिले आहेत. जे आठवल्यावर नेहाच्या डोळ्यातून अनेकदा अश्रू येतात. असंच काहीसं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, सा रे गा मा प लिटल चॅम्प्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जजच्या भूमिकेत बसलेली नेहा कक्कर एका स्पर्धकाच्या परफॉर्मन्सनंतर खूपच भावूक होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नेहा स्टेजवर उभ्या असलेल्या एका स्पर्धकाला सांगते की, 'मला एक गोष्ट सांगायची आहे. तू म्हणालास की, तुझे वडील चौकीदार म्हणून काम करायचे.


हे ऐकून मला खूप आनंद झाला कारण माझी मोठी बहीण शिकत असलेल्या शाळेच्या बाहेर माझे वडील समोसे विकायचे. तेव्हा त्या शाळेतील सगळी मुलं सोनी दीदींची चेष्टा करायचे की, तुझे वडील एवढं छोटं काम करतात. पण आज मी गर्वाने सांगू ईच्छिते की, वडिलांनीच आम्हाला खूप मोठ केलं.


असे म्हणत नेहाला रडू कोसळतं. नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलीवूडमध्ये येण्याआधी नेहा धार्मिक समारंभात भजन गायची. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी नेहा लहानपणापासूनच रात्रभर जागरणांमध्ये गाणी गायची. यानंतर तिने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून तिच्या सक्सेस स्टोरीला सुरुवात झाली. यानंतर नेहाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 


ती या शोचं विजेतेपद जिंकू शकली नाही, पण प्रसिद्धीच्या झोतात नक्कीच आली. कॉकटेल चित्रपटातील सेकंड हँड जवानी हे तिचं पहिलं गाणं हिट ठरलं. त्याचवेळी यारियां चित्रपटातील सनी सनी या गाण्याने नेहाला अजून प्रसिद्ध मिळाली. आज नेहाच्या नावाचा समावेश बॉलीवूडच्या टॉप सिंगर्समध्ये होतो.