मुंबई : गुरु रंधावा आणि नेहा कक्कडर यांचे नवं गाणं 'और प्यार करना है' अखेर रिलीज झाल आहे. या जोडीचं हे पहिलचं गाणं आहे. या दोन्ही गायकांनी या गाण्याला आवाज दिला आहे. दु: खी रोमँटिक गाण्याच्या शेवटी एक वळण आहे. हे गाणं शेवट पर्यंत पाहवं लागेल.या गाण्याचा शेवट खूप भन्नाट होतो.काहिंनी या गाण्याचा शेवट आवडलाय तर काहिंना या गाण्याचा शेवट कंटाळवाणा वाटलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा कक्कर एका हॉस्पिटलमधून रिपोर्ट फाईल घेवुन बाहेर येते.... अशी या गाण्याची सुरुवात आहे. तिच्याकडे जगण्यासाठी फार दिवस नसतात परंतु तरीही ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, तिला बॉयफ्रेंड गुरू रंधावासोबत आनंदांने घालवायचे असतात.


या गाण्यात नेहाच्या आजाराच्या आधी हे दोघं वेगळे झाल्याचं दाखवण्यात आलयं.या नंतर हे दोघेही फार दुखावलेले असतात. या गाण्यात थ्रोबॅक व्हिडीओ देखील दाखवण्यात आलय. हे दोघं कसे अलिप्त होतात ते कसे दुखावले गले ते या गाण्यात दाखवल गेलयं.या गाण्याच्या शेवटी नेहाचा मृत्यू होतो, आणि या गाण्याला एक नवं वळण देखील येतं



गुरु हा माणूस नाही तर आत्मा आहे. ज्याच्याबरोबर तिने सर्व वेळ घालवला असतो. नेहाच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र होतात, अशा प्रकारे 'और प्यार करना है' टायटल या गाण्याला दिलं गेलय. म्युझिक व्हिडिओमध्ये गुरु आणि नेहाची केमिस्ट्री भन्नाट दाखवण्यात आली आहे.


या गाण्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या पुन्हा प्रेमात पडतील हे नक्की.या गाण्याचे बोल सईद चौक्री यांनी लिहिले असून, साचेत-परमपारा यांनी या गाण्याला संगीत दिलयं.