मुंबई :  बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडने काही दिवस सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी झोपायला जात आहे. हे  जग जेव्हा सुंदर होईल तेव्हा मला उठवा असं सांगत तिने सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे अनेक वाद निर्माण झाले आहे. बॉलिवूडमध्ये असणाऱ्या घराणेशाहीने सुशांतचा बळी घेतला अशा अनेक चर्चा रंगत आहेत. परिणामी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इन्स्टाग्रामवर सध्या नेहाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 'मी झोपायला जात आहे. हे जग सुंदर होईल तेव्हा मला उठवा. असं जग जिथे स्वतंत्र प्रेम, आदर, काळजी, आनंद चांगले लोक असतील. मला अशा जगात नाही राहायचंय जिथे द्वेष, घराणेशाही, हिटलर, हत्यारे, आत्महत्या आणि वाईट लोक असतील..' असा संदेश तिने नेटकऱ्यांना दिला आहे. 


शिवाय, घाबरू नका मी मरत नाही. फक्त काही दिवसांसाठी जात आहे. असं देखील ती म्हणाली आहे. सांगायच झालं तर याआधी सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम, आयुष शर्मा आणि जहीर इकबाल या कलाकारांनीही त्यांचं ट्विटर अकाउंट काही काळासाठी बंद केलं.


१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रेमधील त्याच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीला त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरवले जात आहेत. 


सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी किड्सच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर अभिनेत्री कंगना रानौत सारख्या बाहेरून आलेल्या आणि बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.