कुणीतरी येणार गं! नेहा कक्करकडे गुडन्यूज?
नेहा कक्कर कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना सतत प्रतीक्षा होती.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिच्या लग्नाला बराच काळ लोटला असला तरी चाहत्यांना अद्याप खुशखबर मिळालेली नाही. नेहा कक्कर कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना सतत प्रतीक्षा असते. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्करचे असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यात ती प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात होता.
प्रेग्नंसीच्या बातमीचं सत्य
नेहा कक्करची हे फोटो शेअर करत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते आणि अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं सातत्याने बोललं जात होतं. अभिनेत्री लवकरात लवकर गुड न्यूज देईल याचीही चाहते वाट पाहत होते. मात्र, आता तिचा एक व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, नेहा कक्कर प्रेग्नंट नाही तर तिचं पोट फुगलं हे तिच्या खाण्यापिण्यामुळे झालं होतं. साहजिकच चाहत्यांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही.
का फुगलं होतं नेहा कक्कर पोट?
पापाराझी विरल भयानीने हा फोटो शेअर करत लिहीलंय की, यानंतर सगळ्या गॉसिप बंद झाल्या पाहिजे आणि ते फोटोशॉप केला गेलेला फोटोदेखील ट्रेंड होणं बंद झालं पाहिजे. ज्याला यूट्यूबवर शेअर केलं जात आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहने त्यांच्या परिवारासोबत एक व्हिडिओ बनवलाय ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, ती प्रेग्नंट नाहीये.