मुंबई : जगभरात नेहा कक्करचे लाखो फॅन्स आहेत. नेहा कक्करच्या (Neha kakkar) लग्नाची बातमी आली तेव्हा अनेक चाहत्यांचा नक्कीच हार्टब्रेक झाला असेल. पण नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग (Neha kakkar and rohanpreet singh) यांच्या लग्नाला सोमवारी 2 वर्ष झाले आहे. दोघांनी लग्नाचा वाढदिवस आणि दिवाळी एकत्र साजरी केली. नेहाने तिचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दिवाळीच्या दिवशी नेहाने कुटुंबातील सदस्यांसोबतचे फोटो शेअर केले होते. या उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले आहेत. नेहा आणि रोहनप्रीतने मॅचिंग आउटफिट्स घातले आहेत. तिने एक डान्स व्हिडिओ देखील शेअर केला आणि तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहाने पांढऱ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. तिने त्यावर हिरवा दुपट्टा आणि हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. रोहनप्रीतने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता, पायजमा आणि हिरवी पगडी घातली आहे. नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कर, तिचे पालक नीती कक्कर आणि हृषीकेश कक्कर यांचा एक कौटुंबिक फोटो देखील शेअर केला आहे.



24 ऑक्टोबर 2020 रोजी नेहा आणि रोहनप्रीत विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस दिवाळीच्या दिवशीच आल्याने आनंद द्विगुणीत झाला होता.