Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3:  'प्राइम व्हिडीओ'वर याच महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर-3'ची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शोसंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत असतानाच कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच दिसलेल्या अनेक भूमिकांची चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे छोटा त्यागी या भूमिकेत असलेल्या विजय वर्माच्या पत्नीची म्हणजेच लोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तिचे अनेक फोटो आणि तिच्यासंदर्भातील माहिती सध्या नेटकऱ्यांकडून अधिक प्रमाणात शोधली जात आहे. तिने अभिनेता विजय वर्माबरोबर बेडरुममध्ये शूट केलेला एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही अभिनेत्री रातोरात नवी नॅशनल क्रश झाली आहे. मात्र हा सीन शूट करताना या अभिनेत्रीच्या हृदयाची धडधडही वाढली होती असं तिनेच सांगितलं आहे. हा सीन शूट करताना नेमकं काय घडलं याबद्दल तिने खुलासा केला आहे.


कोण आहे ही अभिनेत्री?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव नेहा सरगम असं आहे. 'मिर्झापूर-3'मधील आपल्या भूमिकेने नेहाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्याचं सोशल मीडियावर तिच्याबद्दल असलेल्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. यापूर्वी तिने अनेक धार्मिक मालिकांमध्ये काम केलं आहे. 2012 साली प्रदर्शित झालेल्या रामायण मालिकेमध्ये नेहाने सीता मातेची भूमिका साकारली होती. नेहाने केवळ सीता माताच नाही तर 'यशोमती मय्या के नंदलाला' मालिकेमध्ये यशोदा मातेची भूमिका साकारलेली. त्याचप्रमाणे नेहाने 'परमावतार श्री कृष्ण' मालिकेमध्ये लक्ष्मी मातेची भूमिका साकारलेली. धार्मिक मालिकांबरोबरच नेहाने 'चांद छुपा बादल में', 'एक बार फिर', 'डोली अरमानों की' या आणि इतर मालिकांमध्ये काम केलं आहे. फार लोकांना याची कल्पनाही नाही पण नेहाने 'इंडियन आयडल 2' या शोसाठी ऑडिशन दिलं होतं. 'इंडियन आयडल 2'च्या दुसऱ्या फेरीदरम्यान गाणं गाताना शब्द विसरल्याने नेहाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.


त्या बेडरुम सीनबद्दल नेहाने केला मोठा खुलासा


आता याच मल्टी टॅलेंटेड अभिनेत्रीने मिर्झापूरसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. मिर्झापूरच्या तिसऱ्या पर्वामध्ये छोटे त्यागी भूमिका साकारणाऱ्या विजय वर्मा आणि कथनकामध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा सरगमादरम्यान एक इंटिमेट सीन आहे. यासंदर्भात 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना नेहाने हा सीन शूट करताना आपण फार नर्व्हस होतो असं सांगितलं आहे. मात्र त्याचवेळी मी हा सीन शूट करताना कम्फर्टेबल असेल यासाठी विजयने विशेष काळजी घेतल्याचंही नेहाने आवर्जून नमूद केलं आहे. आपण नव्हर्स असल्याचं विजयला समल्यानंतर, 'त्याने मला तो सुद्धा घाबरला आहे', असं प्रांजळपणे सांगितल्याचं नेहा म्हणाली. तसेच आपण हा सीन उत्तमप्रकारे पडद्यावर उतरवू शकतो असा विश्वास दिग्दर्शकाला होता, असंही नेहा म्हणाली. 


नक्की पाहा हे फोटो >> 'सलोनी भाभी'चा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ; पाहा या अभिनेत्रीचे चर्चेतील फोटो


मी स्वत:ला समजावलं की...


या सीनसंदर्भात बोलताना नेहाने, मी स्वत:ला समजावलं की आपण हा शो स्वीकारतानाच हा कौटुंबिक कार्यक्रमासारखा नसेल याची जाणीव होती. त्यामुळेच आपण आज हे शुटींग करत असून आपल्याला हे करावेच लागेल, असं म्हटलं.