मुंबई : टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्माच्या अभिनयाने तिला इंडस्ट्रीत भलेही विशेष स्थान अद्याप मिळाले नसेल, परंतु तिच्या स्टायलिश लूकने ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. 


नेहाचा बोल्ड अवतार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा काही दिवसापासून कोणत्याही टीव्ही शो किंवा चित्रपटात दिसली नाही. परंतु असे असूनही ती लोकांमध्ये चर्चेत असते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार! नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते. दररोज तिचे वेगळे रुप चाहत्यांना पाहायला मिळते.



आता पुन्हा एकदा नेहाची बोल्ड स्टाइल पाहायला मिळाली आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.


या फोटोमध्ये अभिनेत्रीने डेनिम जीन्स परिधान केली आहे. यासोबत तिने काळ्या रंगाचा ब्रॅलेट पेअर केला आहे.


नेहाचा सोशल मीडियावर अंदाज



बोल्डनेसच्या सर्व मर्यादा मोडत नेहाने यावेळी शर्टची बटणे उघडली आहेत. तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना भुरळ


तिची किलर स्टाईल कोणालाही भुरळ घालण्यासाठी पुरेशी आहे. 



आपल्या बोल्ड अदाकारीने नेहाला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे. चाहते इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.