मुंबई : 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच 'मेकअप' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकर देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यातील एक गाणं गायिका नेहा कक्करच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलं आहे. ‘कसे निराळे हे करार प्रेमाचे’ हे गाणं नेहासाठी अत्यंत खास आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याला कारण देखील तसचं आहे. नेहा कक्करचं ‘मिले हो तुम हमको’ या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळविली होती. या  गाण्याच्या मराठी व्हर्जनला नेहाने आवाज दिला. तर गाण्याचे मेल व्हर्जन गायक स्वप्नील बांदोडकरने गायले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


नेहाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली असून तिचा हा व्हिडीओ रिंकूनेदेखील इन्स्टावरुन  शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ‘मिले हो तुम हमको’ हे गाणं नेहाच्या अत्यंत जवळचं गाणं आहे. 


‘मिले हो तुम हमको’ गाणं नेहाचा भाऊ टोनी कक्करने तयार केलं आहे. याबद्दल सांगताना नेहा म्हणते, 'मिले हो हमको' या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. हिंदी आणि मराठी मध्ये गाणं गाण्याची संधी मला मिळाली म्हणून मी खूपच आनंदित आहे. हिंदी आणि पंजाबी भाषा येत असल्यामुळे गाण्याचं मराठी व्हर्जन माझ्यासाठी फार कठीण होतं. पण गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे आणि आमच्या दिग्दर्शकांनी मला खूपच मदत केली, असं नेहाने सांगितलं. 


आतापर्यंत नेहाने फक्त 'सैराट' हा एकच मराठी चित्रपट पाहिला आहे. त्यानंतर आता रिंकूसाठीच नेहा पार्श्वगायन करताना दिसणार आहे. त्यामुळे ती फार आनंदी आहे. सुजॉय रॉय यांची कथा असलेल्या या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ भूमिका साकारणार आहेत.