मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफने 'हिरोपंती' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. टायगच्या चाहत्याची संख्या देखील फार मोठी आहे. टायगरच्या चाहत्यांच्या यादीत फक्त मुली नाही, तर मुलांची संख्या देखील फार मोठी. टायगरची फिटनेस, डान्स, अभिनय आणि यशस्वी करियरमुळे तरूणायीच्या गळ्यातील ताईद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर लवकरचं अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टायगर आज प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहे. एका सिनेमासाठी तो बक्कळ मानधन घेतो.



रिपोर्टनुसार, टायगरकडे 11 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 84 कोटी रुपयांची संपत्ती आहे. टायगरने गेल्या वर्षी मुंबईच्या वांद्रे भागात 8 बीएचके आलिशान घर खरेदी केलं. 


मीडिया रिपोर्टनुसार त्याने आलिशान घरासाठी 31.5 कोटी रुपये मोजले आहेत. त्यांच्या आलिशान घरात एक ओपन जीम आणि रॉक क्लायम्बिंग एरिया आणि डान्स स्टुडीओ देखील आहे. 



 


दुसरीकडे टायगर श्रॉफला गेम्सची प्रचंड आवड आहे. शिवाय सुपर फायटर लिग सोबत देखील संग्लन आहे. शिवाय टायगर बंगळुरू टायगर्सचा को-ओनर देखील आहे. 


कोट्यवधी संपत्तीचा मालक असलेल्या टायगरकडे महागड्या कार कलेक्शन देखील आहे. टायगरकडे एक रेंज रोव्हर आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये आहे. 


रेंज रोव्हरशिवाय त्याच्याकडे SS Jaguar आणि  बीएमडब्ल्यू सीरीज देखील आहे.