मुंबई : सध्या सर्वत्र  'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमा पाहून अनेकांना गहीवरून देखील आलं. प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमा राज्य करत आहे. 11 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झालेला 'द काश्मीर फाइल्स' हाऊस फुल होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता  'द काश्मीर फाइल्स' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  'द काश्मीर फाइल्स' सिनेमाला झी स्टुडियोने निर्मित केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार zee 5 ओटीटी वर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यत येत आहे. 


रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, सिनेमा मे महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होवू शकतो. पण अद्याप तारीख नक्की करण्यात आलेली नाही. काही दिवसांनंतर तारखेची घोषणा करण्यात येणार आहे.


'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेला हृदयद्रावक अत्याचार पडद्यावर दाखवण्यात आला आहे.