सेक्रेड गेम्स २: नवं पर्व, नवी नावं
`अहम ब्रह्मास्मि` छह दिन मे सब कुछ दिखाई देने लगेगा
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सस्पेंस थ्रिलरच्या चाहत्यांना 'सेक्रेड गेम्स २' ची प्रतीक्षा होती. 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीजनमधील शेवटाला निर्माण झालेल्या रहस्यामुळे नेटफ्लिक्सने दर्शकांची उत्सुकता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर १४ दिवसांनंतर काहीतरी मोठं होणार असल्याचं सागितलं होतं. परंतु १४ दिवस पूर्ण होण्याआधीच नेटफ्लिक्स इंडियाने पुढील सीजनबाबत संकेत दिले आहेत.
'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीजनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खानने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं. आणि आता येणाऱ्या 'सेक्रेड गेम्स २'मुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिकेला पोहचली आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात चार फोटो आणि या चार फोटोंना चार टायटल देण्यात आले आहे. पोस्ट करण्यात आलेले हे चार फोटो 'सेक्रेड गेम्स २'च्या चार एपिसोडची नावं असल्याचा अंदाज लावला जात आहे. या फोटोला, बोलो 'अहम ब्रह्मास्मि' छह दिन मे सब कुछ दिखाई देने लगेगा असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
'सेक्रेड गेम्स' नेटफ्लिक्सची पहिली प्यूयर इंडियन वेबसीरीज आहे. या वेबसीरीजला भारतासह जगभरातून मोठी पसंती देण्यात आली. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत होते. या सीजनच्या शेवटाला राधिका आपटेचा मृत्यू होतो. त्यामुळे आता दुसऱ्या भागात नवाजुद्दीन आणि सैफ यांची गोष्ट काय असेल, पुढे काय होणार याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ही सीरीज अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शन केलं आहे.