मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नेटफ्लिक्सवरील बहुप्रतिक्षित 'सेक्रेड गेम्स २' प्रदर्शित झाला. 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या पर्वानंतर चाहत्यांना 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या पर्वाची जबरदस्त उत्सुकता होती. १५ ऑगस्टला 'सेक्रेड गेम्स २' प्रदर्शित झाल्यानंतर आता ही सीरीज ऑनलाइन लीक झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सेक्रेड गेम्स २' प्रदर्शित झाल्याच्या काही वेळातच सीरीजचे ८ भाग तमिल रॉकर्सने (Tamilrockers) लीक केले आहेत. सीरीज लीक झाल्यामुळे 'सेक्रेड गेम्स २'च्या व्ह्यूअरशिपवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यत आली आहे. 


तमिल रॉकर्सकडून हॉलिवूडचा प्रसिद्ध शो 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'नार्कोस' लीक करण्यात आला होता. 



याआधी देखील तमिल रॉकर्सने त्यांच्या वेबसाइटवर अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट ऑनलाइन लीक केले आहेत. 


'सेक्रेड गेम्स २'चं अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज घेवाण यांनी दिग्दर्शन केलं आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, सुरवीन चावला, ल्यूक केन्नी आणि कल्कि कोचलिन या कलाकारांनी 'सेक्रेड गेम्स २'मध्ये भूमिका साकारली आहे.